इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना 1500 रुपये महिना पेन्शन लगेच करा अर्ज : Apang Penshion Yojana 2023

दिव्यांग योजना महाराष्ट्र 2023 : आपलं महाराष्ट्र सरकार विविध प्रकारे विविध घटक साठी गरजू लोकांसाठी योजना आणत असतात आता त्यांनी राज्यातील दिव्यांगांसाठी त्यांना आर्थिक मदत होईल म्हणून इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत अपंग असलेल्या लोकांना आर्थिक मदत केली जाईल आपल्या भारत देशाची लोकसंख्या बघता मोठ्या प्रमाणावर दिव्यांगाची संख्या आहे आपल्या समाजातील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून आपण ह्याकडे बघतो दिव्यांग व्यक्तींना सुद्धा इतर लोकांप्रमाणेच हक्क समानता इतर रोजगार देऊन त्यांच्यावर जीवनातील अंधकार दूर व्हावा यासाठी अनेक दिव्यांग कायदे योजना या देशात अस्तित्वात आहे.Indera Gandhi Apang Penshion Yojana

इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेचे उद्दिष्ट काय :

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत लिपीक पदाची भरती सुरू

इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे समाजातील दिव्यांग अपंग व्यक्तींना आर्थिक मदत आधार देणे हा आहे अपंगांना त्यांचे जीवनमान सुधारून ते स्वावलंबी होतील त्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी कोण इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही जेव्हा त्यांना वाटते की आपण कोणावर तरी अवलंबून आहोत तेव्हा त्यांनी नवीन काम करण्यास उत्साह वाटत नाही आत्मविश्वास कमी होतो जेव्हा त्यांना त्यांची दैनंदिन कामे वस्तू इत्यादींसाठी पैशाची अत्यंत गरज असते ह्या इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेमुळे अपंग व्यक्तींना कोणत्याही कामासाठी पैशासाठी कोण आहे इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही हे मूळ उद्दिष्ट आहे.Indera Gandhi Apang Penshion Yojana

Indera Gandhi Apang Penshion Yojana

योजनेसाठी पात्रता:दिव्यांग योजना महाराष्ट्र 2022 मराठी

  • अर्जदार हा सरकारी कार्यालयात काम करणारा नसावा.
  • लाभार्थी/ अर्जदार यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सरासरी रुपये 35000/- पेक्षा जास्त नसावे.
  • या योजनेत केवळ 80 टक्के अपंगत्व असलेली व्यक्तीच अर्ज करू शकते.
  • अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील असावी त्या अर्जदारांचे वास्तव्य कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्यात असावे.
  • अर्जदाराचे वय 18 ते 79 वर्षाच्या दरम्यान असावे.

Google सोबत काम करून लाखो रुपये कमविण्याची संधी

इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेचे फायदे :

  • स्वतःच्या दैनंदिन काम आणि गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.
  • या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये पेन्शन दिले जाईल.
  • महाराष्ट्र राज्यातील फक्त अपंगांना इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

कागदपत्रे :

जन्मदाखला ,आधार कार्ड, पॅन कार्ड ,पासपोर्ट आकाराचा फोटो ,चालू असलेला मोबाईल नंबर, पत्त्याचा पुरावा ,बँक खाते पासबुक झेरॉक्स ,80 टक्के अपंगत्व प्रमाणपत्र

इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेसाठी ऑफलाइन अर्ज भरायचा असेल तर काय करावे :

  • इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम अर्जदाराला जिल्हाधिकारी कार्यालय/तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागेल
  • तिथे जाऊन तुम्ही इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेचा फॉर्म विचारून घेऊ शकता.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती वाचून व्यवस्थित रित्या अर्ज भरा..
  • अर्जासाठी गरज असलेल्या सगळे कागदपत्र सोबत ठेवा
  • जी कागदपत्रे अर्जासोबत जोडायचे आहे त्याची प्रत झेरॉक्स अर्जाला जोडून तो
  • अर्ज तिथे भरून द्या.
  • अर्जाची व्यवस्थितरित्या पडताळणी करून झाल्यानंतर तुमचे पेन्शन हे सुरू होईल इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना साठी ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर काय करावे लागेल.
सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”