Divyang Scholarship 2023 : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

महारष्ट्र राज्यात अंध  व दिव्यांग विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे इयत्ता नववी आणि दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ जाहीर केली गेली आहे तसेच  या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दिव्यांग विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.  व तसेच राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरील (एनएसपी) NSP सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. या प्री-मॅट्रिक योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरावेतअसे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे. प्रत्येक अनुदानित शाळांनी त्यांच्याकडील शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मदत करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थी स्वतंत्रपणे देखील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील दिव्यांग विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षण घेता यावे, आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात त्यांना अडचणी येऊ नये या हेतूने  ही योजना सुरु करण्यात आली आहे.

शिष्यवृत्ती योजना पात्रता निकष :

 • अनुदानित शाळांतील इयत्ता नववी ते दहावी चे विद्यार्थ्यां शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात
 • शिष्यवृत्तीला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागू राहणार आहे.
 • विद्यार्थ्यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% किंवा त्याहून जास्त असावे.
 • सक्षम अधिकाऱ्याची दिव्यांगत्वाचे वैद्य प्रमाणपत्र कायद्यानुसार असावे.
 • पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा जास्त नसावे.
 • पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना 9000 ते 14600 मिळेल.

अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा :

 • ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 30 नोव्हेंबर
 • शाळा स्तरावरील अर्ज पडताळणी : 15 डिसेंबर
 • जिल्हास्तरावर अर्ज पडताळणी : 30 डिसेंबर

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट :

 • www.scholarships.gov.in
 • www.depwd.gov.in

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!